गेली ४ वर्षे सीकेपी बँक पुन्हा सुरु करण्यासाठी बँकेचे संचालक श्री राजेंद्र फणसे यांची लढत आपणापैकी अनेकांच्या कानावर आली असेलच. जुन्या संचालक मंडळातील काही भ्रष्ट सदस्यांनी या बँकेला अक्षरशः ओरबाडलंय. त्यांचे पराक्रम पाहिलेत तर 'बँकेला लुटण्याचे शास्त्र' त्यांना किती अवगत आहे याची आपल्याला कल्पना येते. परतफेडीची सुतराम शक्यता नसलेल्या लोकांच्या नावे दिलेली भरमसाठ थकलेली कर्ज आणि त्यांचे तितकेच फसवे जामीनदार यांच्या सुरस कथा फणसे यांच्या तोंडूनच ऐकाव्यात. अतिशय निगरगट्ट आणि राजकीय लागेबांधे असलेले ही मंडळी अनेक नोटिसा बजावूनसुद्धा जेव्हा दाद देईनात तेव्हा पोलिसांत तक्रार करून त्यांना वठणीवर आणण्याखेरीज काही पर्याय नाही हे फणसे यांनी जाणले आणि अक्षरशः भल्याभल्यानां वठणीवर आणले.
तसं पाहता राजेंद्र फणसे यांचे सीकेपी बँकेत कोणतेही फिक्स डिपॉजिट नाही किंवा त्यांनी कोणतेही कर्जदेखील घेतले नाही. परंतु जेव्हा आयुष्याची सर्व पुंजी बँकेत ठेवून आज अक्षरशः रडकुंडीला आलेल्या हजारो हतबल जेष्ठ नागरिकांना बँकेचे दार ठोठावताना पहिले तेव्हा मात्र न राहवून फणसे यांनी या लढ्यात उडी घेतली. जवळपास २०० कोटींच्यावर असलेली थकीत कर्जे वसूल करण्यासाठी त्यांनी, सद्य संचालक मंडळाने आणि कर्मचारी वर्गाने जीवाचे रान केले आणि जी कधीच बंद होणार होती त्या बँकेला रिजर्व बँकेकडून आजवर जीवदान मिळवत आणले. सीकेपी बँक आजही सुरूआहे ती केवळ फणसे आणि त्यांच्या धडाडीच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच. सीकेपी बँक डिपॉजिटर्स फोरम सुरु करून त्यांनी हजारो ठेवीदारांच्या मनात एक आशा पल्लवित केली आहे आहे ते सर्व ठेवीदार विशेष करून जेष्ठ नागरिक त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने लक्ष ठेऊन आहेत.
सीकेपी बँक बंद होणे म्हणजे नुसतीच एखादी वित्तसंस्था बंद होणे नाही तर आपल्या सीकेपी समाजाच्या नावाला कायमचा कलंक लागेल हे मनात ठेऊन राजेंद्र फणसे यांनी आता सीकेपी समाजाकडे मदतीची साद घातली आहे. आज सीकेपी बँकेच्या संचालक मंडळात श्री राजेंद्र फणसे हे एकमात्र सीकेपी संचालक आहेत आणि त्यांच्या मदतीला चार्टर्ड अकाउंटंट श्री सागर जयवंत हे तज्न्य संचालक म्हणून कारभार पाहत आहेत. आज बँकेला वाचवण्यासाठी प्रत्येक सीकेपी समाजबांधवाने शेअर्स घेऊन या लढ्यात सहभागी होणे ही केवळ गरजच नाही तर प्रत्येक सीकेपी व्यक्तीचे कर्तव्य आहे. कदाचित आपल्याला डिव्हिडंड मिळण्यास काही अवधी जरूर लागेल परंतु यानिमित्ताने सीकेपी समाजाचा जास्तीत जास्त सहभाग हा भविष्यात या बँकेला तारक ठरेल आणि सीकेपी या नावाची प्रतिष्ठा उंचावण्यास मदतच करेल.
रुपये एक हजार किंवा त्या पटीत शेअर्स घेऊन आपण आपला सहभाग आणि अर्थातच भविष्यात मतदानाचा हक्क प्राप्त करू शकता. चला एकत्र येऊन आपल्या बँकेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देऊ... सीकेपी म्हणजे निष्ठा - सीकेपी म्हणजे विश्वास हे पुन्हा एकदा सिद्ध करू.
समीर जयंत गुप्ते
विश्वस्त - सिकेपी ज्ञातीगृह ट्रस्ट, ठाणे.
अध्यक्ष - सीकेपी चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, ठाणे - मुंबई -पुणे
अध्यक्ष - सीकेपी बिजनेस डेव्हलपमेंट फोरम, ठाणे.
अध्यक्ष - इम्पॅक्ट प्रिंटर्स असोसिएशन ठाणे
उपाध्यक्ष - सौ. मंगला कर्णिक एज्युकेशन सोसायटी, पुणे.
संस्थापक - द सीकेपी फूड फेस्ट.
संस्थापक - द स्पेशल वुमन एक्स्पो.
संस्थापक - वेकअप ठाणे फाउंडेशन
फोन - ९८२०४९२९०५
ई-मेल - sameer6949@gmail.com
कार्यालय -
रामकृष्ण अपार्टमेंट्स,
सीकेपी हॉल समोर,
खारकर आळी, ठाणे (प) ४००६०१.

No comments:
Post a Comment