वेक अप ठाणे फाउंडेशन तर्फे ठाणेकरांना खडखडून जाग आणणारी से नो टू ड्रग्स बाईक रविवार दिनांक २३ डिसेम्बर २०१८ रोजी ठाणे येथे पार पडली. ठाण्याच्या घोडबंदर रोड वरील कासारवडवली येथील ट्रॉपिकल लगून येथून सकाळी १० वाजत सुरु झालेली ही बाईक रॅली हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड, मानपाडा, टिकुजिनी वाडी जवळील कोठारी कंपाउंड, ग्लाडीस अल्वारीस रोड वरून काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, लोक उपवन, वसंत विहार, देवदया नगर, शात्री नगर, वर्तक नगर, समता नगर - सिंघानिया स्कुल, कॅडबरी जंक्शन, नितीन कंपनी, ठाणे महानगर पालिका, अल्मेडा रोड, चरई नाका, गजानन महाराज चौक, राममारुती रॊड, गडकरी रंगायतन, जांभळी नाका, टेम्बी नाका, कोर्ट नाका या मुख्य रस्त्यांवर फिरून ठीक १२ वाजता सीकेपी हॉल ठाणे येथे संपन्न झाली. ठाण्यातील व बाहेरून आलेल्या सुमारे ३५० बायकर्स व त्याचे बरोबर असलेल्या तितक्याच नागरिकांनी या रॅलीत सुरुवातीपासूनच सहभाग घेतला. जशी जशी रॅली पुढे जात होती तसे तसे अधिकाधिक बायकर्स दुचाकीधारक या रॅलीत सहभागी होत होते.
या रॅलीची का गरज पडली असा प्रश मला जेव्हा काही मंडळींनी विचारला तेव्हा 'ठाणेकरांचे डोळे उघडण्यासाठी' असे उत्तर सारखे मनात येत होते. आज ठाण्यासारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात तरुणांना आणि भावी पिढीला चुकीच्या दिशेला नेणारी अनेक व्यसन देखील फोफावत आहेत. ठाण्याच्या उच्चभ्रू वस्तीत तर ड्रग्स सारख्या नशेच्या आहारी जाणारी युवापिढी कधी कधी तर जस्ट फन या नावाखाली या नशेच्या आहारी जातात आणि सुरु होते त्या कुटुंबाची वाताहात.नुसती नशा नाही तर त्या नशेसाठी घरातून सुरु होणाऱ्या छोट्या चोऱ्या आणि हळूहळू त्या नशेच्या अमलाखाली स्वभावात भिनणारी गुन्हेगारी या मुलांना एका विध्वंसक मार्गावर नेऊन ठेवते. अशा वेळेला आपण पोलीस आणि प्रशासनावर टीका करून मोकळे होतो. कुठेतरी आपली चूक असते, दुर्लक्ष असते, आपल्या मुलांबरोबर घडणार संवाद हा अपुरा असतो म्हणूनच इथे आपल्यातच जागरूकता निर्माण करणे गरजेचे होते. ही रॅली पोलीस आणि गुन्हेगार याच्याविरुद्ध नसून आपल्या स्वतःच्या जागृकतेविषयीची होती - सम्जम्हणून आपण या क्षाराचे काही देणे लागतो ही जाणीव निर्माण करणारी होती.
आणि अशा एखाद्या हाकेला प्रतिसाद देणारी शेकडो माणसे पहिली की आपण योग्य विषयाला हात घातला आहे याचे समाधान होते. ही रॅली संपूर्णपणे वेक अप ठाणे फाउंडेशनच्या माध्यमातूनच आयोजित केली होती आणि कोणत्याही राजकीय सहभाग आणि हस्तक्षेपही नव्हता. असे असूनसुद्धा आपली राजकीय पदे बाजूला ठेऊन नगरसेवक मित्र सुहास देसाई, नगरसेविका परीषा सरनाईक,नगरसेविका सौ. आमरे, शिवसेना युवा नेते श्री केदार दिघे सहभागी झाले. याबरोबरच शौर्य फाउंडेशन, हालाई लोहाणा फाउंडेशन ट्रस्ट, इम्पॅक्ट प्रिंटर्स असोसिएशन, सीकेपी चेम्बर ऑफ कॉमर्स, अभिनय कट्टाचे सर्वेसर्वा श्री किरण नाकती, ठाणे एन्फिल्ड क्लब आणि ऑल इंडिया विंटेज ग्रुप चे अनेक सदस्य बायकर्स, प्रिय मित्र श्री अमोल मथुरे, अम्बर जोशी, श्रीलाल माधवन, निलेश धवन यांच्यासारखे शेकडो मित्र या रॅलीत सहभागी झाले. श्री कमलेश सतीश प्रधान यांच्या ज्ञानसाधना महाविद्यालयातून जवळपास ३० मोटारसायकलस्वार विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेऊन या उपक्रमास साथ दिली. जितो या सेवाभावी संस्थेचे पियुष शहा आणि त्यांच्या सहकार्यांनी सुद्धा शेवटपर्यत साथ देत रॅलीचे व्यवस्थापनास मदत केली. अनेक तरुणी सुद्धा मोठ्या हिरहिरीने त्यांच्या स्कुटी घेऊन या रॅलीत सहभागी झालेल्या पहिल्या. या रॅलीसाठी पोलीस प्रशासनाने संपूर्ण सहकार्य दिले. ट्रॅफिक उपायुक्त श्री अमित काळे साहेबांपासून सुरूझालेले सहकार्य ठाणे शहराच्या प्रत्येक पोलीस स्टेशनकडून मिळाले. यात माझे मित्र व पोलीस अधिकारी श्री स्वप्नील प्रधान यांचा उल्लेख करणे गरजेचे आहे कारण नुसतीच परवानगी साठी मदत नाही तर प्रत्यक्ष रॅलीत सहभागी होऊन या विषयावर त्यांचा अनुभव कथन करून त्यांनी उपस्थितांचे मने जिंकली.
रॅली समाप्तीनंतर एक मोठ्या फलकावर सर्व बायकर्स नी आपली स्वाक्षरी करून *से नो टू ड्रग्स* या कार्यक्रमात आपली उपस्थिती नोंदवली.
वेक अप ठाणे फाउंडेशन तर्फे या रॅलीच्या आयोजनात फाउंडेशन च्या अनेक सदस्यांनी आणि मित्रांनी मोलाची मदत केली. यात चेतन चिटणीस,केतन ठक्कर, अमोघ मथुरे, दिलीप सत्रा, बिसलेरी चे विभागीय विक्री व्यवस्थापक राहुल लिखिते, मुबीन खान, कौशिक प्रधान, सलील होशिंग, निलेश गुप्ते, विनीत ठक्कर, रेडिओ सिटी चे अभिजित मोकाशी, सुबोध वैद्य, शशांक गडकरी, अस्मिता वढावकर, योगिनी चौबळ, विनय चौबळ, स्नेहा भोपटकर आणि महेंद्र वाघमारे या सर्वांचा मोलाचा वाटा होता. वेक अप ठाणे फाउंडेशन तर्फे एका संवेदनशील विषयावर आयोजित या रॅलीला आणि या फाउंडेशनच्या पहिल्याच उपक्रमाला मिळालेला भव्य प्रतिसाद बघून ठाणेकर नक्कीच जागरूक होतील अशी आशा आहे. भविष्यात नागरिकांचा सहभाग असलेले आणि शहराच्या प्रश्नांवर तोडगा शोधणारे अनेक कार्यक्रम करताना ठाण्यातील सुजाण नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे नम्र आवाहन देखील आम्ही करत आहोत. अधिक माहितीसाठी वेक अप ठाणे फेसबुक ग्रुप वर जॉईन व्हा आणि आमचे पेज https://www.facebook.com/Wake-Up-Thane-485941875226291/?modal=admin_todo_tour नक्कीच लाईक करा.
No comments:
Post a Comment