"चवदार मराठा" या आलिशान अस्सल मराठी रेस्टोरेंट कम बार मधून काल रात्री पार्टी केल्यावर घरी येऊन छान झोपलो होतो. कधी सकाळ झाली कळलंच नाही. सकाळी सकाळी दारावरची बेल वाजली ... कामधेनू डेअरीचे मालक गायकवाड काका स्वतः दुधाची पिशवी ठेऊन लिफ्ट मध्ये शिरताना दिसले. काका आज तुम्ही ? ''हो रे, गणपती आहे ना, आज एक मुलगा नाही आला " असे म्हणत ते लिफ्ट मध्ये शिरले. मी पुन्हा झोपायला गेलो. पुन्हा बेल वाजली .. वरच्या मजल्यावरचे तांबे..आज त्यांच्या मोबाईल शोरूम च्या उदघाटनाची आठवण देण्यासाठी सगळ्यांची बेल मारत उतरत होते. काही मिनिटे जातायत न जातायत तोवर पुन्हा बेल घणाणली ... चायला आता कोण असे म्हणून दार उघडले तर नाना पाटलाचा म्हणजे आमच्या इस्त्रीवाल्याचा धाकटा मुलगा हातात कपडे घेऊन समोर उभा .. काय कामाला लावतो हो नाना या लहान मुलांना. आता दरवाजा हलकेच ओढून मी तयारीला लागलो. घरात पण सणानिमित्त काम काढले होते. आमच्या जाधवमामानी...म्हणजे वयाने फार मोठा नाही हा जाधव पण याला सगळे मामाच म्हणतात..सुतार कामाचे म्हणजेच फर्निचरचे काम सुरु केले होते. तो पसारा कमी कि काय म्हणून परममित्र उम्या देशमुख नि पेंटिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन घराच्या भिंती खरवडायलापण सुरुवात केली होती. कामाला जायचा तसा मूड नव्हता पण आमचे सारथी (ड्रायव्हरला खुश करणारा समानार्थी शब्द हो) जोशी काका चावी घेऊन खाली गेलेत हे कळलं होतं. काही महत्वाच्या कामासाठी ऑफिसला जायलाच हवे होते. बायकोला टाटा करून निघताच ''दरवाजा उघडाच ठेव, प्रकाश मच्छीवाला यायची वेळ झाली आहे' असे म्हणाली. इमारतीच्या खाली उतरताच सिक्युरिटी वाल्या शिंदेनि कडक सलाम ठोकला... दसरा दिवाळी जवळ आली कि हि मंडळी जरा जास्तच जवळीक साधतात.
गाडीत बसून निघालो.. नेहेमीप्रमाणे मुंडे पेट्रोलपंपावर पेट्रोल भरून गाडी परळ कडे निघाली. मुंबईच्या ट्रॅफिक ला तोंड देत ऑफिसाला पोहोचतो तर काय ... रात्री झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे इलेक्ट्रिसिटी नाही आणि फ्लक्चुएशनमुळे एसी बिघडलाय. बोंबला. आता बोलवा दामले इलेक्ट्रेशनला आणि मकु ला .. म्हणजे मराठे कुलींग्सला. आज निघताना डब्बा मुद्दामच नव्हता घेतला.. ऑफिससमोरच्या आचरेकरांच्या 'रस्सा' या मालवणी रेस्टोरेंट मध्ये फिश थाळी छान मिळते असा ऐकून होतो..म्हटलं आज ट्राय करूयात. तसही विजेअभावी ऑफिसमध्ये काम होत नव्हत, स्टाफ बसूनच होता..दिवस फुकटच गेला म्हणायचा. जेऊन परतीची वाट धरली. येताना वाटेवरच दादर च्या चित्रा टॉकीज जवळ भिसे हलवाई चे फेमस दुकान दिसले . मुलांसाठी साठी काहीतरी घेऊ म्हणून जोशींना गाडी बाजूला लावायला सांगितली. पाहतो तर काय दुकानात आडसुळे बिल्डर्स चे मॅनेजर रहेजा साहेब पण मिठाई घ्यायला आलेले. मला पाहून रहेजा पण खुश झाले. समोरच्या टी शॉपी कडे बोट दाखवत म्हणाले चला साहेब चहा घेऊ. "कडक चहा - एकदा पिऊन तर पहा " अशी मस्त पाटी लिहिलेल्या दुकानाचा मालक समोर हसतच उभा होता. बैसक्या ??? साल्या तुझा कॅफ्फे आहे हा ? अस मी बोलताच रहेजा म्हणाले ..केफे नका बोलू साहेब ..बैसकर पिसाळतो...टी शॉपी बोला. चहाच्या पुड्या विकणाऱ्या श्रीपाद बैसकर ने 'बेस्टि' नावाचं प्रशस्त टी पार्लर थाटलं होतं. मस्त गप्पा मारता मारता कडक चहा चा एक कप झाल्यानंतर कुठूनतरी जोरजोरात बायकोचा आवाज कानावर आला .. उठतोय्स ना ... चहा ओतलाय केव्हाचा ... उठ चहा गार होईल... च्या मारी स्वप्न होतं हे सगळं? ... कमाल आहे यार,स्वप्न पण अशी काही मराठमोळी पडतात ना हल्ली काय सांगू. पहाटेची साकार होतात असे म्हणतात, पण सकाळची ?
जाऊदे स्वप्नात काय गुंतायचं ... ही म्हणते चहा तयार आहे म्हणजे बनवारीलाल वेळेवर दूध टाकून गेलाय आणि पांडे ड्रायवर तर आलाच असेल खाली, हिरापरसाद ला फोन करतो म्हणजे झटपट कपडे पाठवेल इस्त्रीचे. बिस्वकर्मा कार्पेंटर आणि घनस्याम पेंटरची माणसं यायच्या आत मी आंघोळ उरकून घेतली. सिक्युरिटी वाल्या चौरासिया ला जयरामजीकी करून गाडीत बसलो. पल्ला मोठा आहे. मुंदडा पट्रोलपंपावरून पेट्रोल भरून पुढे परळ ..छे छे.. अप्पर वरली ला जायचंय ..आणि हो..आजचा लंच हिलसा मध्ये आहे..बंगाली स्टाईल तेही रहेजा बिल्डर कडे काम करणाऱ्या अडसुळे साहेबांबरोबर...या जमलं तर आज माझ्या ऑफिसला - 'बरिस्ता' मध्ये बसून 'आपला माणूस कुठे मागे पडतो' या विषयावर गप्पा मारत मारत छान कॉफी घेऊयात.
समीर गुप्ते
सूचना-यालेखाचाकोणत्याहीराजकीयघटनेशीसंबंधनाही.खात्रीसाठीसत्यपरिस्थितीआणिवास्तवतपासूनपहा.हालेखलहानसहानव्यवसायालातुच्छसमजणाऱ्याकाही मराठीबांधवानाआणिमुंबईतयेऊनकोणतेहीकामकरूनस्वतःचेभविष्यघडवणाऱ्यादेशबांधवालासमर्पितआहे.जयमहाराष्ट्र!

No comments:
Post a Comment