जे मी लिहितोय आणि जे तुम्ही वाचताय ते केवळ दोन गोष्टीमुळे शक्य झालय. एक म्हणजे शिक्षण आणि दुसरं म्हणजे मुद्रण. मुद्रण हा शब्द नव्या पिढीला फारसा जवळचा किंवा वापरातला नसला तरी आताच्या या घडीला या मुद्रणाशिवाय त्यांचं पानही हालत नसावं... अगदी पेपरलेसच्या जमान्यात सुद्धा. आज तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या पण कदाचित तुम्हाला फारसं परिचित नसलेल्या या मुद्र्णक्षेत्रविषयी म्हणजेच प्रिंटिंग (आता कसं ओळखीचं वाटलं ना ) या विषयाची थोडी ओळख करून देतो. बालपणी जेव्हा पहिल्यांदा पुस्तक हातात आलं तिथूनच तुमचं आणि प्रिंटिंग च नातं जुळलंय. तुम्हाला शिकवायला, तुम्हाला प्रगत व्हायला आणि नंतर तुम्हाला प्रशस्तिपत्रकाद्वारे शाबासकी द्यायला सुद्धा प्रिंटिंगच लागतं.
जोहान्स गुटेनबर्ग या जर्मनीमधल्या लोहाराने (हा सोनार होता असेही बोलले जाते) या आधुनिक प्रिंटिंगचा शोध लावलाय हे सांगूनही खरं वाटणार नाही. तत्पूर्वी चीन मध्ये लाकडाचे ठसे बनवून छपाई चालत असे. परंतु शिसे वापरून बनवलेले टाईप, ज्याला फार पूर्वी मुद्रणातील खिळे ही म्हटले जायचे ते बनवून प्रथम बायबल छापण्याचे काम करून आधुनिक मुद्रणाचा जनक म्हणून नावलौकिक प्राप्त केलेला तो जोहान्स गुटेनबर्ग. साधारण १०० ते १५० वर्षे याच तंत्राने छपाई केल्यानंतर, जगभरातून येत असलेल्या वाढत्या मागणीला अनुसरून पुढे यातलेच लिथो ऑफसेट सुरु झाले. लिथोप्रेस म्हणजे अक्षरशः एका मोठ्या लादीवर प्रकाशाच्या व रसायनांच्या साहाय्याने उमटवलेल्या भल्यामोठ्या ठश्यातून निर्माण होणारी छपाई. त्यानंतर च्या काळात तलम कापड ताणून बसवलेल्या लाकडी चौकटीच्या साहाय्याने करता येणारी स्क्रीन प्रिंटिंग हे अनेकांना उपयोगी सिद्ध होऊ लागले. आजकाल वेगवेगळे मेसेज लिहिलेले टी शर्ट्स जे आपण पाहतो ते या स्क्रीन प्रिंटिंगमुळेच. त्यानंतर एका दिवसात लाखो कागद छापून तयार करणाऱ्या ऑफसेट मशीनचा अविष्कार झाला. मोठमोठाली पुस्तके, कादंबऱ्या काही दिवसात तयार होऊ लागली ती केवळ या तंत्रज्ञानामुळेच. वर्तमान पत्र छापणाऱ्या भल्या मोठ्या रोटरी मशिन्सही ठिकठिकाणी आपले रूप बदलत होत्या. एका बाजूने कागदाचा रोल लावल्यावर दुसऱ्या बाजूने संपूर्णपाने छापून ५०/६० पानांचा अगदी सुरेख घडी घातलेलं वर्तमानपत्र मिनिटाला हजार या वेगाने बाहेर येणारे तंत्रज्ञान आज जुने झाले आहे. आज डिजिटल प्रिंटिंग चा जमाना आहे. संगणक तर घरोघरी आले आहेत. तुमच्या संगणकावरून केली जाणारी कामे, डिझाईन तात्काळ छापायची असलेया आज आपल्याला प्रिंटरकडे म्हणजेच मुद्रकाकडेसुद्ध जायला नको. एक क्लिकवर सुंदर रंगीबेरंगी छपाई ची सोय आता आपल्या घरातच उपलब्ध झाली आहे. आज बाहेर पडताच दिसणारे शेकडो जाहिरात फलक सुद्धा काही मिनिटातच फ्लेक्स मशीनद्वारे तयार होतात. तुमचे स्वतःचे चित्र तुमच्या टी शर्ट वर छापण्यासाठी एका कागदावरून तुमच्या टी शर्टवर घेता येते याला सबलीमेशन प्रिंटिंग तंत्रज्ञान असे नाव आहे. भविष्यातच कशाला तर आज अनेक देशात थ्री डी प्रिंटिंग म्हणजेच दिलेल्या डिझाइननुसार वेगवेगळ्या आकारात वेगवेगळ्या प्रकारात कोणताही साचा न वापरता अनेक वस्तू बनवता येतात नव्हे छापता येतील अशीही सोय आहे ..अगदी तुमच्या पायातले बूट सुद्धा. देशाच्या चलनी नोटा, स्टॅम्प पेपर आणि इतर शासकीय मुद्रण सामुग्री छापण्यासाठी आपल्या देशाची सिक्युरिटी प्रेस आहे. वेगळ्या कागदावर खास तयार केलेल्या शाईने या सर्व गोष्टी छापल्या जातात. सध्याच एक नवीन ट्रेंड आपण पहिला असेलच ... वाढदिवसाच्या केक वरती एखादे छान चित्र किंवा ज्याचा वाढदिवस असतो त्याचेच चित्र असते. म्हणजे खाण्यायोग्य शाईने ही छपाईदेखील आता शक्य झाली आहे.
वेळ बदलली, गरज बदलल्या. कागदच नव्हेतर इतर अनेक माध्यमांवर उतरलेल्या मुद्रणाच्या अनेक कलाविष्कारामधें आपल्या ओळखीच्या हजारो वस्तू मिळू लागल्या. प्रथमतः फक्त शैक्षणिक आणि माहिती पुरवणे या उपयोगासाठी प्रचलित असलेले प्रिंटिंग आज आपल्या जीवनाचा एक हिस्सा बनले आहे.
तुमच्या घराला लावलेला जो आकर्षक वॉलपेपर असतो तो तर या मुद्रणातूनच निर्माण झालेला आहे. तुमचा संगणक, त्याचा की बोर्ड, तुमचा टीवी, तुमचे घड्याळ तुमचा मोबाईल सुद्धा प्रिंटिंगमुळेच तयार होतो हे सांगितल्यास तुमचा विश्वास बसणार नाही. प्रिय व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या गुलाबाच्या पाकळ्यांवर, तुमच्या दातांवर, तुमच्या नखांवर तुमच्या शरीरावरसुद्धा छपाई होऊ शकते. दागिन्यासारखे मिरवत येईल अशा डोळ्यावर लावण्याच्या छापील सोनेरी लेन्सेस काही दिवसांपूर्वीच पहिल्या.
अन्न, हवा व पाणी याबरोबरच आजच्या युगातील जीवन जगण्यासाठी छपाईची गरज आहे हे म्हणणे सुद्धा गैर ठरणार नाही. मुद्रण हे शास्त्र आहे आणि कलासुद्धा. अनेकदा याचा उपयोग द्वेष पसरवणारे संदेश पाठविण्यासाठी केला जातो. परंतु हीच कला, हेच शास्त्र आनंददायी आणि विधायक कार्यासाठी वापरले तर जगाच्या प्रगतीचा वेग अजूनही वाढेल यात शंका नाही.
समीर गुप्ते
कीर्ती प्रिण्टलिंक्स - ठाणे
अध्यक्ष - इम्पॅक्ट प्रिंटर्स असोसिएशन, ठाणे
( DNS Bank डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या २०१९ च्या कॅलेंडर्स वरील माहितीपर लेखांमध्ये प्रकाशित झालेला आधुनिक प्रिंटिंग या विषयावर मी लिहिलेला हा लेख)