मी खुल्या वर्गाचा,
मी खुल्या दिलाचा,
याचना न रक्तात माझ्या,
समर्थ मी....दणकट मनगटाचा !
सीकेपी घरात, पर्यायाने एका सूशीक्षित, सुसंस्कारी, सुविचारी आणि खऱ्या अर्थाने पुरोगामी समाजात जन्माला आल्याचा मला यथार्थ अभिमान आहे. विषमता निर्माण करणारी जात पात वर्ण भेद न मानता माणुसकी हाच धर्म मानण्याची शिकवण घेत झालेल्या संस्कारांना अभिमानाने मिरवत स्वकर्तृत्वावर ज्ञानप्राप्ती आणि धनप्राप्ती करून जीवन साजरे करणारे आम्ही चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. अडचणी, अपेष्टा आणि अनेक संकटाना सामोरे जाण्याची शक्ती आणि मानसिकता नसानसांत भिनलेला हा सीकेपी समाज कोणत्याही जातीच्या निकषांवर कधीही झोळी पसरवणार नाही. स्वार्थासाठी कोणी काय मागावे आणि कसे जगावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण ते करताना सामाजिक नाती कलुषित करण्याचा डाव खेळणाऱ्यांना आणि समाजासमाजात दरी निर्माण करणाऱ्यांना माझ्या विचारांचे समाजबांधव कदापि माफ करणार नाहीत. मी आधी मराठी आहे, नंतर सीकेपी आहे. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या गांजलेल्या प्रत्येक मराठी माणसाला, मग तो कोणत्याही जातीचा असो, स्वाभिमानाने जगण्यासाठी मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजेत या मताचा मी आहे. ज्यादिवशी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम समाज रस्त्यावर उतरेल त्या मोर्चात माझ्यासारखे हजारो सहभागी होतील. जय महाराष्ट्र !
समीर गुप्ते, ठाणे.

No comments:
Post a Comment