हे असं मोठ्ठ टायटल लिहिण्याचं कारण म्हणजे मामलेदारवरचं प्रेम, दुसरं काही नाही. आम्ही ठाणेकर मिसळ खायला जायचं असल्यास , येतो का मामलेदारला' इतकंच बोलतो. आज अनेक ठिकाणी सुप्रसिद्ध मामलेदार मिसळ असे बोर्ड लावलेले पाहतो. पण ज्या जागेवर मनापासून प्रेम केले त्या गर्दीच्या आणि कायम गजबजलेल्या ठाण्याच्या तहसीलदार कचेरीच्या कँटीन मध्ये, जे आता फक्त मामलेदार मिसळ म्हणून ओळखले जाते, तिथे आणि फक्त तिथेच जाऊन मिसळ नव्हे तर कमीतकमी दोन मिसळीवर ताव मारतो. तसं पाहिलं तर थोड्याशा एलिट क्राउड साठी यांनी आमंत्रण नावाचे एक छान हॉटेल देखील बाजूलाच सुरु केलंय. पण इतकी सोफिस्टिकेटेड मिसळ खाण्याची सवय नाही अजून जडली मला .. गर्दी गचडीतली, खिशात पैसे आहेत कि नाही हे चाचपत लाईनीत उभं राहून जागा मिळवलेली आणि प्लॅस्टिकच्या करड्या रंगाच्या बशीतली तीच मिसळआजही छान वाटते.
तसं पाहता आजवर हजारो लोकांनी या मामलेदार मिसळीची रम्यकथा किंवा महती तुम्हाला सांगितलीच असेल त्यात मी नवीन ते काय सांगणार. पण तरी देखील 'खाल्ल्या मिसळीला जागायलाचं हवं' म्हणून हा एक प्रयत्न. तर या मामलेदार मिसळ अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या मिसळ सम्राटाकडे एक भलं मोठं मेनू कार्ड म्हणजे मेनू फलक पण आहे. एकूण ५२ पदार्थ असलेल्या या मेनूबोर्ड वरचे दोनच पदार्थ इथे चालतात ..एक मिसळ आणि दुसरा त्यावरचा उतारा म्हणजे ताक. उताराच म्हणूया.. कारण एकदा लालेलाल मिसळ खाल्यानंतर तुमच्या आत्म्याला शांत करणारं या जगात काही असेल तर ते थंडगार ताकच असतं.
मामलेदारची मिसळ जरी बोर्डावर एकच असली तरी वेगवेगळ्या तिखटाच्या मापात मोजली जाते.. म्हणजे लाईट, मिडीयम, मिडीयम बिगर बटाटा, रेग्युलर मिसळ आणि तिखट. यातली लाईट मिसळ म्हणजे ज्यांच्यात (दुसऱ्या दिवशी त्रास सहन करण्याची) डेरिंग नसते पण मामलेदारची मिसळ खाल्ली आहे असं गावभर मिरवायचं असतं त्यांच्यासाठी. मिडीयम मिसळ म्हणजे, खातो पण उद्या ऑफिसला जाताना लफडा नको अशा मंडळींसाठी योग्य असलेली मिसळ. मिडीयम बिगरबटाटा म्हणजे, आम्ही येथे नेहेमीच येतो आम्हाला मिसळमधलं कळतं अस दाखवणाऱ्यांसाठी बटाटा नसल्यामुळे थोडी अधिक तिखट झालेली मिसळ. रेग्युलर मिसळ म्हणजे, मेनू बोर्डवर मिसळपाव या सदरात मोडणारी आणि इथे पहिल्यांदाच आलेले, लाईट मिडीयम असले प्रकार माहित नसलेले आणि दुसऱ्यांच्या टेबलावर बघून ऑर्डर देणाऱ्या मंडळींची लाडकी मिसळ. आणि सर्वात शेवटी तिखट मिसळ .. हे खाणारे लोक म्हणजे टॉप क्लास मिसळ नव्हे तिखट खवय्ये. विषही दिले तरी पचवतील अशा दिसणाऱ्या या मंडळींच्या एकूण अवताराकडे पाहूनच त्यांची तिखट खाण्याची कपॅसिटी कळते. इथे आपला टिकाव लागणं शक्यच नाही, भलते साहस नकोच.
साधारणपणे रेग्युलर मिसळ खाणाऱ्या माणसाची काय अवस्था होते ते सांगतो. हा माणूस आल्याआल्या 'दोन मिसळ घे रे' अशी एकदम कडक ऑर्डर देतो. मग मिसळ येईपर्यंत इथे तिथे बघत बसतो तोच टेबलावर दोन काचेच्या बशा आपटून त्यात दोन दोन पाव ठेवले जातात. मिनिटा दोन मिनिटात लालबुंद तवंग असलेला खतरनाक रंग पांघरलेली, मधूनच डोकावणारी शेव दिसणारी आणि वर मस्त कांदा लेऊन नटलेली आणि कोणत्याही ट्रे शिवाय फक्त बोटांच्या साहाय्याने आणलेली एक खोलगट डिश तुमच्या टेबलावर अवतरते. नाही नाही.. लगेच खाऊच शकत नाही तुम्ही राव. त्यातले दोन रुतवलेले चमचे काढणं पण दिव्य असतं ..मिसळ सांडण्याची हमखास शक्यता. नंतर 'काय मस्त ना' अशा एक्प्रेशन नी मिसळपाव ग्रहण सोहळा सुरु होतो. पहिल्या दोन चार घासापर्यन्त आयुष्य अतिशय सुंदर असतं, नंतर मिसळ तुमच्या सर्व शरीराचा ताबा घ्यायला सुरुवात करते. तुम्ही वर बघता.. पंखा सुरूच असतो. 'जमतंय ना रे हे तिखट तुला' असं बरोबर च्या मित्राला विचारलं जातं. घासागणिक मिसळ कोरडी होत जाते. समोर बसलेल्या गिऱ्हाइकाने ऑर्डर दिली म्हणून ' दोन रस्सा घे रे' ही तुमची ऑर्डर तुमचा जवळजवळ सत्यानाश करते. रस्सा तर मिसळीपेक्षा तिखट. खा लेको. कपाळावर घाम साचलेला, नाकातलं पाणी टेबलावर पडण्याच्या तयारीत, डोळे तर ऑलरेडी वाहायला लागलेले, जिभेला चरचर आणि थोबाडाला आग लागलेल्या परिस्थितीत तुम्ही रुमाल काढता. पांढराशुभ्र रुमाल क्षणात रंग बदलतो.. एव्हाना तुमच्याकडून ताकाची ऑर्डर नकळत गेलेली असते. ताक तुम्हाला क्षणिक शांती देत खरं पण खाल्लेली मिसळ पुढच्या २४ तासात तुमचं अंतर्बाह्य शुद्धीकरण करण्याच्या तयारीला लागलेली असते. बिल फार मोठं येत नाही हाच काय तो मोठा आनंद. हॉटेलच्या गल्ल्यावर सर्व ऋतूत,सर्व हवामानात, सर्व परिस्थितीत, सकाळ संध्याकाळ कधीही शून्य एक्स्प्रेशन घेऊन लेंगा शर्ट घालून बसलेले लक्ष्मणशेट एकही शब्द न बोलता उरलेले पैसे परत देतात. त्यांच्या बाजूला नेहेमीच कोणी ना कोणी कायम उभा असतो,
त्यांना बरंच काहीतरी सांगत असतो आणि त्यालाही लक्ष्मणशेटची उत्तरे तशीच हावभावशून्य. पण अतिशय सज्जन माणूस. खरं सांगतो मी हजार दीडहजार वेळा त्यांच्याकडे गेलो असेन पण त्यांची माझी साधी ओळखही नाही .. किती जणांशी ओळख ठेवणार हो ते. ज्या नव्या पिढीला मामलेदार म्हणजे काय हे माहित नाही ते बहुदा यांनाच मामलेदार नावाचे कोणीतरी समजत असावेत.
मामलेदार मिसळीचे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे ही मिसळ तुम्ही कधीही खाऊ शकता. तुमचा कोणी ठाणे नगर पोलीस चौकीत लॉकअप मध्ये असताना, तहसिदार कचेरीत डोमेसाइल सर्टिफिकेट काढायला जाताना, स्टेशनरोड वर खरेदीला जाताना इतकंच नव्हे तर मागच्या रस्त्याला असलेल्या स्मशानात एखाद्याला पोचवल्यानंतर पण मिसळ खायला जायची प्रथा सध्या जोरात आहे.. मी तर आजच माझे जेष्ठ मित्र सुधाकर वैद्यांना स्मशानातून डायरेक्ट तिथे घेऊन गेलो होतो. पाहतो तर काय, स्मशानतला सगळा माणूस तिथेच. अहो आमच्या मामलेदार मिसळची लोकप्रियता दुसरं काय.
मला अजूनही प्रश्न पडतो की ते मेनू बोर्डवरचे उरलेले ५० पदार्थ कोण खात असेल. गेलात तर बोर्ड वाचून पहा.. पण जा नक्की. मामलेदार मिसळीच्या तिखटपणातला गोडवा तुम्हाला परत परत बोलावल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मी देतो, बघा तुम्ही.
-समीर गुप्ते
Image Source - Google

No comments:
Post a Comment