गेल्या वर्षी पुणे येथे सीकेपी फूड फेस्ट आयोजित करताना मिनरल वॉटर च्या स्टॉलसाठी फोनवरून एका कंपनीशी चर्चा सुरु होती. त्या कंपनीतर्फे फोन करणाऱ्या माणसाचे नाव एल्विस वूल्गर असे होते आणि अतिशय नम्रतापूर्वक हा माणूस माझ्याशी बोलत होता. त्याने मला त्यांच्या डेक्कन येथील कार्यालयात बोलणी करण्यास बोलवले. मोबाईलवर त्याने जेव्हा पत्ता पाठवला तेव्हा 'ट्वेंटीएथ मार्च वॉटर्स' नावाने ही कंपनी असल्याचे कळले. का बरं हे नाव असेल या ब्रॅन्डचं? असे कुतूहल मनात ठेऊनच मी त्यांच्या कार्यालयात गेलो. त्या कंपनीचे प्रमुख संचालक श्री अविचल धीवर दरवाजातच माझ्या स्वागतास उभे होते. आणि भेटताक्षणीच मी माझा पहिलाच प्रश्न त्यांना विचारला की '२० मार्चला तुमचा वाढदिवस वगैरे असतो का ?'. त्यांच्याच कंपनीच्या पाण्याची छोटी बाटली माझ्या हातात देऊन म्हणले घ्या साहेब पाणी प्या, बघा कसं वाटतंय. पाणी हे पाण्यासारखंच होतं म्हटलं छान आहे पण माझ्या प्रश्नाचं काय ? तर म्हणाले अहो गुप्ते तुमच्यामुळेच तर हे शक्य झालंय. माझी या माणसाबरोबर ओळख नाही, कधी भेटलो नाही, कुठं नाव ऐकले नाही मग माझ्यामुळे कसं बरं- पण त्यांनी लगेच सांगीतले - गुप्ते साहेब तुमच्या सीकेपी समाजामुळेच २० मार्च हा दिवस आम्ही पाहू शकलो. तुमचा समाजातील पुरोगामी विचारांचे नेते आमच्या पाठी उभे राहिले म्हणून २० मार्च या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्यावर पाण्याचा सत्याग्रह यशस्वी केला. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला होता. डोळ्यासमोर इतिहासाच्या पुस्तकातील बाबासाहेबांचे हातात पाणी घेतलेले चित्र डोळ्यासमोर आले. क्षणभर आपल्या ज्ञातीतील समाजसुधारकांचा मलाच विसर पडला की काय या भावनेने मला स्वतःची लाजही वाटली होती. आपल्या समाजाबद्दल इतक्या जिव्हाळ्याने आणि आदराने बोलणारी अविचल धीवर ही व्यक्ती मात्र मला मनातूनच भावली होती. गप्पा झाल्या - कामाच्या गोष्टी झाल्या. नंतर आमच्यात कोणताही व्यवहार जरी होऊ शकला नसला तरी त्यांच्या पाण्याच्या बाटलीवरील 'रिस्पेक्ट एव्हरी ड्रॉप' ही टॅगलाईन मनात ठसली होती आणि नकळतच २० मार्च ही तारीख मनात कायमची रुजली होती.
मित्रानो, २० मार्च - चवदार तळ्यातून अस्पृश्यांना पाणी देण्याचा हक्क मिळवून देणारा हाच तो ऐतिहासिक दिवस. या लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या डॉ भीमराव आंबेडकर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेल्या, सुधारणावादी सीकेपी समाजाच्या नावलौकिकाची महती वाढवणारे महाड नगरपालिकेचे तत्कालीन प्रमुख, समाजभूषण कै. सुरबानाना टिपणीस आणि सामाजिक कार्यकर्ते कै. अ. व. चित्रे यांची माहिती आजच्या आपल्या तरुण पिढीला नाही. पण ज्यांच्यासाठी हा सत्याग्रह केला त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी मात्र आपल्या समाजाविषयी आपुलकी व आदर आजही जपलाय. आज पाण्याच्या प्रश्नांवर निवडणुका जिंकल्या जातात परंतु जेव्हा समाजातील एका वर्गाला या मूलभूत गरजेपासून वंचित ठेवले जात होते तेव्हा सीकेपी समाजातील या असामान्य नेतृत्वानी आपली संपूर्ण ताकद यांच्यामागे लावत एक इतिहास घडवला. या लढ्यामुळेच आजचा दिवस भारतामध्ये सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा होतो.
जातिव्यवस्थेमुळे होणाऱ्या अन्यायाविरुद्ध उभे राहून समान हक्कांसाठी लढणाऱ्या पुरोगामी विचारांच्या सीकेपी समाजात माझा जन्म झाला यापेक्षा मोठं ते काय. १९२७ च्या सुमारास देशाच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यानच माणुसकीच्या या स्वातंत्रलढ्यात सुरेंद्रनाथ टिपणीस म्हणजेच सुरबानाना आणि अ. व. चित्रे यांनी दिलेल्या त्यांच्या योगदानाचा यथार्थ अभिमान बाळगून त्यांच्या कर्तृवाचा एक अंश तरी आपल्या अंगी असावा हीच देवाकडे प्रार्थना.
आजच्या या ऐतिहासिक दिवशी महामानव भारतरत्न डॉ आंबेडकर आणि सीकेपी समाजरत्न सुरबानाना आणि अ.व.चित्रे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !
समीर जयंत गुप्ते
विश्वस्त - सीकेपी ज्ञातीगृह ट्रस्ट ठाणे
अध्यक्ष - सीकेपी चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री.
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट
९८२०४ ९२९०५