दरवर्षी सीकेपी फूड फेस्ट आला की मी त्याच्यावर काहीतरी लिहायलाच पाहिजे असा काही नियम नाही. वर्षागणिक फेस्ट ला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता तशी गरजही नसते पण तरीही 'सॅम, तुझा एखादा लेख येउदे रे' असे मेसेज यायला सुरुवात होते आणि मग नकळत तो लेख मनात तयार होतो. नाही म्हटलं तरी प्रश्न पडतोच की आता काय नवीन सांगायचं तुम्हाला..जागा तीच..महिना तोच.. पदार्थ तेच ...पन्नास टक्के स्टॉधारकाही तेच ..आयोजकही तेच आणि दर्दी खवय्येसुद्धा तेच... सांगा वेगळं लिहू तर काय लिहू. पण तरीही अनेक गोष्टी आहेत ज्या वेगळ्या असतात - ज्यातून या फेस्ट चे महत्वसुद्धा वाढते आणि ओढसुद्धा.
आम्हा स्वयंसेवकांचं म्हटलं - म्हणजे सीएफएफ व्हॉलेंटीअर्सचं - तर तारीख जाहीर झाल्यापासून दर दिवसाचे प्लॅन ठरतात. कपडे, रंग आणि थीम सगळं ठरवायचं - आणि कितीही आधी ठरलं तरी ऋग्वेद कारखानीस कडून ते टी शर्ट्स येणार उदघाटनाच्या दिवशीच ..यात वर्षानुवर्षे काही बदल नाही. पण आलेले टी शर्ट्स कधी एकदा अंगावर चढवतोय आणि त्या व्हॉलेंटीअर आर्मी मध्ये कधी उभे राहतोय हे प्रत्येकाला वाटतं ..त्यासाठीच तर वर्षभर वाट पाहिलेली असते. मग दर वर्षी नवीन व्हॉलेंटीअर्स जॉईन होत असतात - त्यांचे इंटरव्यू, थोडीशी थट्टा, जमल्यास दोस्ती खात्यातले रॅगिंग असे मैत्र-संस्कार करून त्याला बऱ्यापैकी माणसात आणलं जातं आणि तासादोन तासातच तो पण आता अजून नवीन कोणी येतंय का याची वाट बघतो. आपल्या नोकऱ्या, धंदे, प्रसंगी अभ्यास सोडून ही मंडळी फेस्टला जणू वाहून घेतल्यासारखीच. काहींच्या आईवडिलांचे स्टॉलही असतात पण त्यांना मदत करायचे सोडून ही मंडळी ज्ञातिसेवेत रमलेली असतात. फेस्ट संपल्यावर माझ्या घरातील श्रमपरिहाराच्या कार्यक्रमात मला फेस्ट मध्ये न समजलेल्या अनेक गोष्टी सविस्तर सांगितल्या जातात. कोण कोणाची किती काळजी घेत होतं, कोण कोणास घरी सोडण्यास तयार होतं, कोण नुसतंच काम केल्यासारखं दाखवत लक्ष भलतीकडेच ठेऊन होतं वगैरे वगैरे आणि बरंच काही. का कोणास ठाऊक पण त्या वेळेस माझ्यात आणि त्यांच्यात वयाच जराही अंतर नसतं.
नंतर येतात स्टॉल धारक, त्यांच्या सूचना आणि शंका. काही जुने स्टॉल धारकानी काही वैयक्तिक कारणास्तव , मुलांच्या परीक्षेमुळे, सासूबाईंच्या आजारपणामुळे (हे कारण सांगायला - तिथे घरात कशावरूनतरी वाजलेलं असतं ) भाग न घेतल्याने नवीन स्टॉलधारकांची एंट्री ही पण एक मजेदार बाब असते. दोन अडीच किलो चे भाजाणी चे वडे संपतील ना कि अर्धा किलो वाढवू, भाऊच्या धक्क्यावरून मिस्टरांना पाच किलो कोलंबी आणायला सांगते अशा भाबड्या तयारीने आलेल्या या उत्साही सुगरणी - त्यांना समजवायला - त्यांचा कॉन्फिडन्स वाढवायला आम्ही आणि जुने स्टॉल धारक तयारच असतो. त्यात उगीचच कारण नसताना एखादा व्हॉलेंटीअर .''ताई काळजी नका करू -आपला समीर दादा आहे मदतीला'' वगैरे सांगून तिला वडे, खिमा पॅटिस वगैरे तळायला आपल्याकडे हमखास एक सीकेपी माणूस असल्याची खात्री देऊन टाकतो.
तुम्हाला माहित आहे का काही स्त्रिया - म्हणजे मध्यवयीन स्त्रिया रोज, म्हणजे तिन्ही दिवस या फेस्ट ला भेट देतात. म्हणजे या फेस्ट ची आवड, कुतूहल, उत्सुकता, ओढ, आपली माणसं वगैरे सगळं ठीक आहे हो पण रोज , तेही मुलुंड, डोंबिवली, ठाण्याच्या घोडबंदर रोडच्या टोकावरून वरून ? मलाही गंमत वाटायची. मग नंतर हळूहळू कळायला लागलं. एखादी स्त्री , साधारण माझ्याच वयाची, मला विचाराते 'काय रे ती तुझ्याबरोबर स्टेजवर होती ती कर्णिकांची मुलगी ना ? छान निवेदन करते हं माईकवर !' तेव्हा मला समजतं की या बाईंचा मुलगा लग्नाचा आहे - त्याच्यासाठीच हे सगळं. मग त्यातून निघणारी अनेक नाती - ते नाहीका आपल्या सीकेप्यांमध्ये ते टिपिकल 'जावेच्या मावसबहीणीची मुलगी', ' नणंदेच्या दिराचा मुलगा; अशा कायम चर्चा. खरंच सांगतो आपल्यात सरळ ओळख सांगण्याची सोयच नाही - नाहुरच्या प्रधानांची मुलगी इतकंच सांगितलं तरी कळतं, पण नाही... ते नाहूर चे प्रधान - चरईतल्या दीक्षितांचे मेव्हणे, आपल्या कसे नात्यात आहेत ते सांगून त्यांच्या घरातलं एक न जमणारे लग्न कस मीच जमवून दिल हे सांगण्याचा उत्साह आपल्यातल्या काहींमध्ये पुरेपूर आणि ठासून भरलेला. (ही आडनावं प्रातिनिधिक आहेत, नाहीतर तुम्ही पण प्रधानांना शोधत बसाल नाहुरच्या प्रधानांना) पण याबरोबरच सीकेपी फूड फेस्ट मध्ये सीकेपी तरुण तरुणींच्या मैत्रीचे रूपांतर नात्यात होते हे देखील पाहायला मिळतंय. समाजातल्या समंजस मुली समाजतल्या समजदार मुलांबरोबर संसाराची स्वप्न पाहू लागल्या तर सीकेपी फेस्ट चे यश अजून ते काय.
२०१४ ला ज्यांनी पहिल्या फेस्ट ला भेट दिली त्यांना एक गोष्ट नक्कीच पटेल. त्यावेळी अनेक मंडळीं एकमेकांना पहिल्यांदा भेटली - ओळखू लागली - फेसबुकच्या सीकेपी खवय्ये, सीकेपी फूड. सीकेपी यंग वर्ल्ड, आम्ही कायस्थ प्रभू या अनेक ग्रुपवरील व्हर्चुअल मैत्रीचे परिवर्तन खऱ्या मैत्रीच्या दृढ नात्यात झालं होतं - अनेक हरवलेले नातेवाईक नव्याने मिळाले होते. २०१४ पूर्वीचा तरुणांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आजचा दृष्टिकोन यात जमीनअस्मानाचा फरक आहे. आज हजारो तरुण एकमेकांच्या संपर्कात आहेत - एकमेकांसाठी कधीही उभे राहतात - समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड करतात. सीकेपी फूड फेस्ट ने अनेकांना उद्योगाची उमेद दिली - यशस्वी होण्याची स्वप्नं दिली यात समाधान आहेच परंतु याच सीकेपीफूड फेस्ट ने समस्त सीकेपी ज्ञातीला एका दिशेने जाण्याची, एकसंघ राहण्याची आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची संधी दिली हेसुद्धा स्वीकारायलाच लागेल. आता सीकेपी फूड फेस्ट हा फक्त खाद्यसोहळा न राहता जणू सीकेपी संस्कृती आणि परंपरा जपणारा सीकेप्यांचा आधुनिक सण असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
आजपर्यंत झालेल्या सर्व सीकेपी फूड फेस्ट ला दिलेल्या उदंड प्रतिसाद, प्रेम आणि सदिच्छांसाठी आपले मनस्वी आभार आणि येत्या म्हणजेच ११, १२, १३ जानेवारी रोजी ठाणे येथील सीकेपी हॉल मध्ये आणि २५,२६,२७ जानेवारी रोजी पुणे येथील मजेत लॉन्स वरच्या सीकेपी फूडफेस्टला येण्याचे माझे हे आग्रहाचे निमंत्रण .... आपल्याच नेहेमीच्या सीकेपी ठसक्यात ....नक्की या !
समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट